fanofpankajatai

fanofpankajatai

Thursday 11 January 2018

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख केंद्रबिंदू समजला जाणारा 'माधवं' फॅक्टर!
यांना एकत्रित करून यांची वज्रमुठ बांधण्याचं काम मुंडे साहेबांनी केले. याच वज्रमुठीच्या आधारे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे अनेकवेळा बदलली. हक्कांच्या गोष्टीपासून नेहमी वंचित राहिलेल्या धनगर माळी व वंजारी समाजाचा मतदानापूरता वापर करून घेणाऱ्या विरोधचा रोष पाहून मुंडे साहेबांनी या तिन्ही वंचित समाजाचे नेतृत्व करत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गल्ली ते दिल्ली यशस्वी प्रयत्न केले. याच कारणांमुळे या तिन्ही समाजाचं एकहाती नेतृत्व साहेबांकडे होते...!
कालांतराने वंजारी, धनगर आणि माळी समाजाला एक अतूट बंधनात बांधून व इतर घटकपक्षांना सोबत घेऊन मुंडे साहेबांनी २०१४ साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तापरिवर्तन करून दाखवले..
महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या १ कोटी २५ लाख आहे तर वंजारी समाजाची लोकसंख्या ४० ते ५० लाख आह.े तसेच माळी समाजाची लोकसंख्या अंदाजे १ कोटीच्या घरात आहे..
२८८ मतदारसंघापैकी १०० मतदारसंघात धनगर,वंजारी आणि माळी समाजाचे वर्चस्व आहे.१०० मतदारसंघात काही ठिकाणी धनगर तर काही ठिकाणी वंजारी आमदार निवडून येऊ शकतो. तर काही ठिकाणी माळी समाजाचा आमदार निवडून येऊ शकतो, हा तिन्ही समाज मिळुन जे ठरवेल तोच आमदार होऊ शकतो या गोष्टींचा सखोल अभ्यास करून मुंडे साहेबांनी राजकारणाच्या सुरुवातीपासूनच या तिन्ही समाजाला एकत्रित करण्याचे काम केले व त्यांची वज्रमुठ तयार केली...!
यासाठी त्यांना मदत झाली ते माळी समाजाचे नेते म्हणुन ओळख असेलेले छगन भुजबळ साहेबांची! इतर वेळी परस्परविरोधी असलेले हे दोन नेते समाजाच्या उपस्थित प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी नेहमी एकत्र येताना कित्येकवेळा पाहायला मिळालेले होते प्रस्थापित सरकारच्या विरोधात जाऊन छगन भुजबळांनी सत्तेत राहून मुंडे साहेबांना अनेकवेळा साथ दिलेली होती.....!
सुरुवातीच्या काळात बी.के.कोकरे धनगर समाजातील आक्रमक अभ्यासु तरुण चेहरा धनगर समाजाला इतर मागासवर्गीय वर्गातून वगळून अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समावेश करून घेण्यासाठी राज्यसरकार विरोधात लढा देत होता. त्याच काळात बी.के.कोकरे यांच्या नेतृत्वाखाली किमान चार ते पाच लाख धनगर समाजाचा मोर्चा नागपूरला अधिवेशनाच्यावेळी काढण्यात आला त्याचे फलित म्हणुन तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवारांनी धनगर समाजाला भटक्या जमातीचा(एनटी) दर्जा देत सवलती लागू केल्या गेल्या....!
१९८९-९० साली पंतप्रधान व्ही. पी.सिंग यांनी देशात ओबीसी लोकांना २७% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.या निर्णयाला उचवर्णीयांचा खासकरून भाजप-शिवसेना या पक्षांनी मोठा विरोध केला यावरून त्यावेळी देशात,राज्यात राजकीय व सामाजिक ध्रुवीकरण झाले त्याचवेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर शिवसेनेचे आमदार असलेले माळी समाजाचे नेते छगन भुजबळ व भाजपाचे आमदार असेलेले बहुजन समाजाचे नेते गोपीनाथराव मुंडे साहेब या दोन्ही नेत्यांनी दबाव टाकत मंडळ आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू करून घेतल्या या शिफारशी लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले यात मुंडे भुजबळ या जोडीचे महत्वाचे योगदान होते....!
त्यानंतर बऱ्याच वर्षापासून स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत असलेल्या वंजारी समाजाला मुंडे साहेबांनी सत्तेत आल्यानंतर स्वतंत्र आरक्षण देत वंजारी समाजाला विमुक्त भटक्या जमातीच्या (एनटी ड) सवलती लागू केल्या... .!
बी.के.कोकरे यांच्या पश्चात मुंडे साहेबांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा याची मागणी उचलून धरत त्या संदर्भात आक्रमक पवित्रा अवलंबून सरकारला धारेवर धरायचे कार्य केले.
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचा आरक्षणाचा मुद्धा साहेबांनी उचलून धरला त्यासाठी आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा करत केंद्र सरकार व राज्य सरकारला वेठीस धरले पण तत्कालीन राज्य सरकारने म्हणजेच (राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस) यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू न करण्याच्या भूमिकेवर ठाम राहत तशी शिफारस केंद्र सरकारकडे करत धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या विषयाला स्थगिती मिळवली....!
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना मिळालेल्या विजयात मुंडे साहेबांचे मोलाचे योगदान होते, याचमुळे त्यांच्या अनुभवी आणि विकासनशील विचारांचा जनतेला फायदा करून देण्यासाठी मोदींनी त्यांना केंद्रीय ग्रामविकास मंत्री बनवले केंद्रात सत्ता आल्यानंतर साहेबांनी सुरुवातीलाच धनगर आरक्षणाचा मुद्धा हाती घेत त्यासाठी आवश्यक गोष्टींच्या तरतुदी करण्यास सुरुवात केली पण दुर्दैवाने साहेबांचे अपघाती निधन झाले आणि परत धनगर आरक्षणाचा प्रश्न रखडला गेला.....!
मुंडे साहेबांच्या हयातीत उदयास आलेले राष्टीय समाज पक्षाचे धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना राजकारणात सक्रिय होण्यासाठी मुंडे साहेबांची साथ,मार्गदर्शन तसेच आशीर्वाद लाभले कसल्याच प्रकारचा मतभेद हेवेदावे न करता साहेबांनी महादेव जाणकरांना राजकारणाचे बाळकडू पाजले याचेच फलित म्हणजे आज जानकर हे एक समाजाबद्दल विकसनशील दृष्टी ठेवणारे उच्च नेतृत्व बनलेले आहेत..
स्वपक्षात धनगर समाजाचा चेहरा असावा ज्याला समाजाच्या समस्यांची पूर्ण जाणीव असावी जो व्यक्ती जमिनीवर राहून धनगर समाजाचे नेतृत्व करू शकेल अशी दूरदृष्टी ठेवत मुंडे साहेबांनी अहिल्याबाई होळकर यांचे वंशज पण राजकारणाचा कसलाच अनुभव नसलेले प्राध्यापक म्हणुन कार्यरत असलेले राम शिंदे यांच्यावर हात ठेवत त्यांना राजकारणात आणले पंचायत समिती सदस्य ते आमदार बनवत साहेबांनी राम शिंदे रुपी एक नवीन नेतृत्व धनगर समाजाला मिळवून दिले....!
या तिन्ही समाजाचे नेतृत्व करत असताना मुंडे साहेबांनी कसलाच भेदभाव न ठेवता संपूर्ण आयुष्य या समाजाच्या विकासाठी खर्ची केले मुंडे साहेब जगले ते फक्त ज्यांचा कोणी वाली नाही ज्यांची कोणी वाणी अश्या लोकांसाठी त्यांच्या पश्चात या समाजाचा कोणीतरी वाली असावा यासाठी त्यांनी जिवंतपणीच या समाजासाठी नेतृत्व निर्माण करत त्यांना खतपाणी घालत हुशार आणि तेजस्वी तसेच आक्रमक बनवण्याचे काम केले त्यातुनच आज या समाजांना पंकजाताई रुपी आभाळा एवढं सक्षम असे नेतृत्व प्राप्त झालेले आहे या नेतृत्वाला साथ मिळते ती साहेबांच्या दोन्ही मानसपुत्रांची ते म्हणजे महादेव जानकर आणि राम शिंदे यांची....!
साहेबांच्या निधनानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर आरक्षणाच्या प्रलंबीत प्रश्नाचे भांडवल करत देवेंद्र फडणवीस सत्तेत आले खरे पण धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे वचन अदयाप त्यांनी पूर्ण केलेले नाही..!
पंकजाताईंनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वारंवार मुख्यमंत्र्यांशी व केंद्र सरकारशी चर्चा केली पण आरक्षणाचे श्रेय पंकजाताईंच्या पदरी पडेल या भीतीने आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवल्याचे दिसते..
आरक्षणाच्या बाबतीत अंतर्गत आणि विपक्षीय नेत्यांच्या श्रेयवादाच्या लढाईत पंकजाताईं एकाकी झुंज देत असल्याचे पाहायला मिळते.
पंकजाताईंमुळे धनगर समाजाच्या दोन प्रमुख नेत्यांना कॅबिनेटमंत्री पद मिळाले तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्तेत असताना देखील पंकजाताईंना सरकारसोबत संघर्ष करावा लागत आहे हे नक्की....!
माळी समाजाचे एक हाती नेतृत्व असेलेले छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी आणि भाजपा या दोन्ही पक्षाने संगममताने एका प्रकरणात अडकवून माळी समाजात फूट पाडायचा डाव आखला असताना वेळीच पक्षाविरोधात जाऊन पंकजाताईंनी छगन भुजबळांची हॉस्पिटल मध्ये भेट घेत नवीन समीकरण आखत माळी समाजाला विखरू पाहणाऱ्या विषारी प्रवृत्तीला जागीच आळा देऊन या समाजातील लोकांचे स्थैर्य टिकऊन ठेवायचे महत्वपूर्ण काम केले....
माळी समाजाने जेवढे प्रेम साहेबांवर केले तेवढेच प्रेम आणि विश्वास पंकजाताईंवर टाकत त्यांच्या नेतृत्वाला एकमान्यता देत समाजा प्रति नवीन आशा पल्लवित केलेल्या आहेत....!
माधव समाजाची असलेली ही वज्रमुठ महाराष्टाच्या राजकारणाची दिशा बदलू शकते या वज्रमुठीची साथ पंकजाताईं सोबत असल्या कारणाने स्वपक्षीय आणि विपक्षीय नेते यात राजकारण करू पाहत आहेत भगवानगडावर होणाऱ्या मार्गदर्शनरुपी भाषणाला पंकजाताईंना झालेला विरोध तसेच चोंडी येथे साजरी होणारी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला महादेव जानकर यांना होणारा विरोध हा स्वपक्षीय आणि विपक्षीय नेत्यांच्या कपटीरुपी असलेल्या राजकारणाचा एक भाग आहे..माधव समाजामध्ये आपआपसात असलेल्या एकीमुळे असल्या कपटी कारस्थानी राजकारणाला इथे थारा मिळणार नाही हे प्रत्येक वेळी सर्व समाजाच्या जनतेने एकत्र येऊन दाखवून दिलेले आहे मग तो दसरा मेळावा (सावरगाव घाट) असो किंवा आझाद मैदान (मुंबई) येथे साजरी होणारी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असो येथे जमा होणारा असंख्य सर्व जाती धर्माचा समुह हेच दर्शवतो की "आंखे खोल के देखो जनता किस के साथ है"....!
माळी धनगर वंजारी(माधव) या समाजाच्या एकी मध्ये विष कालवून कपटी कारस्थानी राज्यकर्त्यांना हा माधव समाज महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय शांत बसणार नाही..
मुंडे साहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहिलेला माधव समाज आज पंकजाताईंच्या रुपी निर्माण झालेल्या नेतृत्वाशी एकनिष्ठ राहणार यासाठी वचनबद्ध झालेला आहे....!
सत्ता परिवर्तनामुळे राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी मंत्री अजित पवार यांचे डोके ठिकाण्यावर आलेले आहे धनगर आणि वंजारी हे दोन समाज घटक राष्ट्रवादीची सत्ता जाण्यासाठी कारणीभूत असल्याचे त्यांनी एका पत्रकारपरिषदे मध्ये जाहीर सांगितले....
प्रस्थापित सरकारच्या विरोधात लढा देत बी.के.कोकरे या उमदा नेतृत्वाने धनगर समाजाच्या पदरात आरक्षण पाडून दिले होते या संपूर्ण गोष्टींचा इतिहास माहिती नसलेले व नेहमी सत्तेचा गैरवापर करत सतत धनगर वंजारी माळी व इतर बहुजन समाजावर अन्याय करणारे अजित पवार यांनी धनगर आरक्षणाचे श्रेय पुण्यात पत्रकारपरिषदे मध्ये शरदरावांना देऊन सत्तापरिवर्तनामुळे स्वतःची मतीभ्रष्ट झाल्याचे दाखऊन दिले....!
अजित पवारांना धनगर माळी आणि वंजारी समाजा मध्ये असलेल्या वज्रमुठीची भीती वाटत असल्याचे समजून येते, माळी धनगर व वंजारी हे समाजघटक महाराष्ट्राच्या राजकारणाचा "पाया" असल्याची जाणीव आज अजित पवारांना झाल्याची दिसते. एवढेच नाहीतर या समाजामध्ये फूट पाडून स्वतःचे राजकारण टिकवण्याचा प्रयत्न अजित पवार करत असल्याचे पाहायला मिळत आहे नेहमी मराठात्तोर इतर समाजाला हीन दर्जाची वागणूक देणाऱ्या अजित पवारांना या समाजाबद्दल कपटी सहानुभूती निर्माण होणे म्हणजे कुठेतरी संशयास्पद वाटते.या समाजात तेढ निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेते व त्यांचे कार्यकर्ते सज्ज झाल्याचे दिसून येत आहे...
त्याचच एक उत्तम उदाहरण म्हणजे दादाहरी मुंडे हे प्याद कोणाचं आहे हे अदयाप समजले नसले तरी या समाजकंठकाणे दसरा मेळाव्याचे औचित्य साधत धनगर समाजाचे मंत्री राम शिंदे यांच्या बाबतची वृत्तपत्रातील एका बातमीचे कात्रण सोसिएल मीडिया च्या माध्यमातून पसरविण्याचे काम केले यामध्ये "मीच मुंडे साहेबांचा वारसदार अश्या आशयाचे राम शिंदे यांचे वक्तव्य होते.अश्या वक्तव्याच्या बातमीमुळे वंजारी समाजाचा रोष राम शिंदे वर येऊन त्यांची प्रतिमा या समाजात मलिन व्हावी यासाठीचे प्रयत्न करण्यात आले.याचा परिणाम दसरा मेळाव्यात दिसून आला राम शिंदे भाषणाला उभे राहताच कार्यकर्त्यांमधून विरोधात घोषणाबाजी करण्यात आली...
या बातमी संदर्भात माहिती देत राम शिंदे यांनी दादाहरी मुंडे या समाजकंठकाचे नाव घेत यामागे त्याचा असलेला हेतु स्पष्ट करत त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला होता..
वंजारी माळी आणि धनगर समाजाची ताकद पंकजाताईंच्या पाठीमागे असल्याकारणाने ताईंचे नेतृत्व आज मुख्यमंत्री पदा पर्यंत पोहचलेले आहे असे म्हणत राम शिंदे यांनी आम्ही ताईसाहेबांचे एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते असल्याचे सिद्ध केलेले आहे.पंकजाताई मुंडे या नेतृत्वाचे अधःपतन करण्या हेतूने स्वपक्षीय तसेच विपक्षीय नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे या गोष्टींमार्फत समजून येते.....!
माळी धनगर आणि वंजारी समाजाची असलेली वज्रमुठ सैल करण्याच्या प्रयत्नात असलेले सर्वपक्षीय नेत्यांना कल्पना नसावी की तुम्ही जेवढं वज्रमुठीला सैल करायला जाताल ती मूठ तेवढीच जास्त घट्ट होऊन उद्या महाराष्ट्राला पहिली महिला बहुजन मुख्यमंत्री होण्याचा बहुमान पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना मिळवून देणार आहे....!

मंगेश गित्ते

Monday 30 October 2017

अमरसिंह पंडितांविरुद्धची कारवाई सुडबुद्धीने कशी काय?

गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांच्याबाबतची  "आमदार पंडितांची शंका खरी ठरली; बॅंकेकडून अखेर गुन्हे दाखल" अशा आशयाची बातमी एका ठिकाणी वाचण्यात आली आणि आश्चर्य वाटले. ती बातमी पूर्ण वाचली तर त्यातील एकांगीपणा कोणत्याही सामान्य वाचकाला लक्षात येण्यासारखा आहे असाच काहीसा आशय त्यातील आहे.

सर्वप्रथम हे प्रकरण समजून घेण्यासाठी काही वर्षे मागे जावे लागेल.  स्वतः अमरसिंह पंडित याच जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते आणि आज त्याच बँकेला त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागत आहेत यापेक्षा मोठा दुर्दैवविलास तो काय? अमरसिंह पंडित आणि त्यांचे आप्तस्वकीय ज्या जयभवानी कारखान्याचे संचालक आहेत त्या कारखान्याने जिल्हा बँकेकडून कोट्यावधींचे कर्ज घेतलेले आहे. या कर्जाच्या सुरक्षेपायी कारखान्याने बँकेकडे रितसर जमीन तारण ठेवली होती, नव्हे तर कायद्याप्रमाणे ठेवावी लागली होती.   त्यानंतर अमरसिंह पंडित आणि इतर संचालकांनी बँकेचे हप्ते थकवले. त्यांना कायदेशीर नोटीसदेखील गेल्या. तरी स्वतः पंडित कुटुंबीय (अ)जाणते शरद पवार यांच्या जवळचे नातेवाईक म्हणून गेवराईमध्ये दादागिरी करत आले.

बॅकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या जमिनीची परस्पर विक्री करता येत नाही असे असताना  यासर्व प्रकरणानंतर जय भवानी कारखान्याने 'ती' जमीन विकण्याचा घाट घातला. ह्या गोष्टीची कुणकुण लागताच बँक आपल्यावर कायदेशीर कारवाई करेल ह्याची जाणीव बँकेच्या माजी अध्यक्ष अमरसिंह पंडित यांना झाली होती. आणि याचमुळे ते परवाच्या मोर्चात  "माझ्याविरोधात प्रशासनाचा गैरवापर करून कारवाई होऊ शकते." असे जाहीरपणे म्हणाले,    बातमीत सांगितलेली ही गोष्ट खरीच आहे की अमरसिंह पंडित यांची भीती खरी ठरली म्हणून पण ते अर्धसत्य आहे.

आता समजून घ्या उरलेले संपूर्ण सत्य.
मिलिटरीमध्ये First Move Advantage म्हणून एक टर्म प्रचलित आहे. याचा अर्थ असा आहे की जो पहिले एखादी गोष्ट बोलतो किंवा करतो त्याला लोकांची सहानुभूती भेटते. जस भारत-पाकिस्तान मध्ये सीमा कोणी ओलांडली यावरून आंतरराष्ट्रीय पटलावर वाद सुरु असतात आणि त्यात जगातील इतर देशांना जो पहिले ओरडतो त्याचेच खरे वाटते. तसा प्रकार आहे सारा. अमरसिंह पंडित यांना पोसणारे शरद पवार यांचा मुंबई बॉम्ब ब्लास्ट खटल्यातील किस्सा प्रसिद्ध आहे. 12 मार्च 1993 साली जे बॉम्ब ब्लास्ट झाले होते तेव्हा शरद पवारांनी एक ठिकाण वाढवून सांगितले होते. त्यामागे काय कारण असावे हे जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेले आहे.

आज अमरसिंह पंडित जो आरोप ना. पंकजा मुंडे यंच्यावर करत आहेत तो अगदी वरच्याच पॅटर्नप्रमाणे आहे.
First Move Advantage आणि पवारनीती या दोहोंचा अमरसिंहानी वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ती बातमी देणाराने बँकेचे अधिकारी, विद्यमान संचालक किंवा पदाधिकारी या कोणाशीही संपर्क करण्याची तसदी घेतलेली नाही हे स्पष्ट आहे. केवळ एकांगी बाजू मांडण्याचा नेमका हेतू काय हे संबंधितांनी स्पष्ट केलेले सर्वांसाठी चांगले असेल; किंबहुना पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांचा आदर पाळण्याचे सौजन्य त्यांनी दाखवण्याची माफक अपेक्षा वाचकांनी बाळगली तर त्यात काय गैर?

त्याच लेखात अमरसिंह पंडितांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचा उल्लेख केलेला आहे. तेव्हा मुंडे साहेबांना हयात असताना छळणाऱ्या पंडितांनी नको त्या गमजा न मारलेल्या बऱ्या. आता शिवाजीराव पंडित कायद्याने आणि कर्माने आरोपी झालेले आहेत तेव्हा आता काहींना त्यांच्या वयाचा कळवळा येत आहे. जरा त्या  सर्वांनी मुंडे साहेबांना कोणत्या वयात छळले याचा विचार करा आणि मग आपले तोंड उघडा. जर कोणी कायद्याविरुद्ध काम केले तर त्याला शिक्षा होणारच हे जगजाहीर आहे. मग, सर्वसामान्यांचे हित जोपासताना प्रशासनाने कारवाई केली तर अन्याय म्हणून ओरडणे कितपत इष्ट आहे ह्याचा प्रत्येकाने विचार करावा.

कायदे 'पंडित' असणाऱ्या आणि कायदा कोळून प्यालेल्या अमरसिंह यांनी आता अन्याय म्हणून ओरडणे म्हणजे खरोखर 'चोराच्या उलट्या बोंबा' असेच म्हणावे लागेल. पण, लक्षात ठेवा कर्जबुडव्या अमरसिंह पंडित आणि त्यांच्या बोलवित्या धन्यांनो की सर्वांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही, ये पब्लिक हैं ये सब जानती हैं।

(BLOG BYE संतोष टाकरस)

Saturday 29 April 2017


मातीशी नाते असलेला आभाळाएवढा नेता
        -#लोकनते #गोपीनाथराव #मुंडेसाहेब

  आपले आभाळाऐवढे मोठेपण विसरून जमिनीशी नाते कायम ठेवणारे,असामान्य कर्तव्य विसरून सर्व सामान्यांत मिळवणारा नेता म्हणून लोकनते गोपीनाथराव मुंडेसाहेब यांच्याकडे पाहीले जाते.या महाराष्ट्रात जेवढे नेते पाहीले पण ते फक्त  वरचढ पणा  दाखविण्यात गर्क आहेत  आम्ही कसे  शेतकऱ्यांचे कैवारी व नेते आहेत. राष्ट्रवादीने व काँग्रेस ने  काल परवा काढलेली संघर्ष याञा चे उदाहरण महाराष्ट्राला माहीत झाले आहेच ना . त्या याञेला नावही साहेब काढलेल्या संघर्ष याञेचे देण्यात आहे. महाराष्ट्राला माहीत आहे  महाराष्ट्र अशा एकच नेता होऊन गेला की  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवाहवा वाटणारा नेता म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब कारण ह्या नेताचा जन्म झाला तो शेतकऱ्यांच्या घरी त्यामुळे मुंडे साहेबाला जमिनीचे घट्ट नाते होते म्हणून व ते शेतकऱ्यांसाठी साहेबांनी नाही तेवढा संघर्ष केला.तो ऊसतोड कामगार साठी असु अथवा गारपीट झाल्यावर शेतकऱ्यांचे गारपीटग्रस्त मदत मिळवून देण्यासाठीच असु अथवा दुष्काळात शेतकऱ्यांकर्याना  धावून मदत करणे होय.
   महाराष्ट्रात सलग दुसर्‍यांदा दुष्काळ पडला. चारा पाण्यावाचून जनावरांचे हाल होत होते.सरकार आपल्या परीने दुष्काळाचा सामना करीत होते. चारा छावण्या उभारल्या होत्या.पंरतु कोणत्याही सरकारी योजनेला भ्रष्टाचाराची कीड सहज पोखरून काढते.या चारा छावण्यांतही घोटाळा होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. तेथील लोकांना ज्या तऱ्हेच्या सुविधा पाहिजेत त्या मिळत नव्हत्या अशी वृत्ते प्रसिद्ध होऊ लागली.तेव्हा एके दिवशी लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका चारा छावणीवर धडकले. ते आलेले पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. अधिकाऱ्यांची धावधाव झाली.परंतु त्याकडे लक्ष न देता मुंडेसाहेब यांनी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.इतकेच नव्हे तर त्या शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न जाणून घेण्यासाठी ते दिवसभर त्या चारा छावण्यांवर थांबले आणि राञीचा मुक्कामही तिथेच केला. महाराष्ट्रातला एकमेव नेता असेल की जो शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्याच्यासोबत रानमावाळावर मुक्कामाला राहतो.
    साहेबांचे भरपूर अनुभव सांगता   येतील व त्यातले अजुक एक अनुभव ९० च्या दशकात आघाडी सरकारच्या काळात कापूस,ऊस उत्पादक शेतकर्यांचे प्रचंड हाल होत होते.विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांनी घाम गाळून मोती पिकवलेले असत.त्यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी स्व लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेबानी महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांना एकत्र करुण न भूतो न भविष्यती मोर्चा काढला.आंदोलने केली. या मोर्चामध्ये ७ लाखांहुन अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आणि आघाडी सरकारच्या विरोधातील असंतोष दाखवून दिला.शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला त्याकाळी मुंडे साहेबांमुळे चांगला भाव मिळाला.
 त्यामुळेच साहेबांवर शेतकऱ्यांकरी असु उसतोड मंजुर असु अथवा हे जिवापाड प्रेम करायचे तसेच साहेब जेथे उभा राहायचे तिथे माणसांचे मोहोळ तयार होईचे.
 तसेच जेव्हा काही दिवसांपूर्वी गारपीट  बीड जिल्ह्यात झाली होती.तेव्हा ताईसाहेबांनी कशाची तमा न बाळगता लगेच मदत करणासाठी धावुन आल्या कारण त्या लोकनेताच्या वारसदार आहेत व ते त्या लोकनेता ला सोभल असेच चालवत आहेत.
  प्रत्येक  शेतकऱ्यांला एकच खंन्त वाटत आहे कि साहेब असते तर असे झाले नसते पण ते नियतीला मान्य नव्हते.पण या शेतकरी असु शेतमजुर असो अथवा उसतोड कामगार असु यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही   ताईसाहेब ही प्रयत्न करत आहेत ते करण्यासाठीच ताईसाहेबासोबत आशिर्वाद असु द्या बाकी काही नको.

Wednesday 19 April 2017


मंत्री पंकजाताईला समजुन घ्या
 बीड जिल्ह्यात कोटीची उड्डाणे नव्हे तर अब्जावधीची उड्डाणे.विकासाचा गड बांधण्याची ताकद

  - राम कुलकर्णी

स्वातंत्र्यानंतर बीड जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिता येईल तो काळ म्हणजे पालकमंत्री ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचा.जिल्ह्यात कोटीची उड्डाणे त्यांच्या माध्यमातुन सर्वत्र होताना दिसत आहेत. अहमदनगर-बीड-परळी रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला. जिल्ह्यातील प्रमुख रस्ते बांधणी जोमाने होत आहे.

अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सोबत घेवुन काम करणारं हे नेतृत्व मुळात समजुन घेण्याची गरज आहे. भुमिका जर समजुन नाही घेतली तर नुकसानही किती होते हा अनुभव तर येतोच. मात्र समजुन घेतलं तर फायदा किती? हेही कळुन चुकु लागलं. नारायण गड, गहिनीनाथ गड यांच्या विकासासाठी कोटीची उड्डाणे पंचेवीसीच्या घरात गेली. हे काम साधंसोपं म्हणणं बालिशपणाचं आहे. जिथं एक रूपया मिळत नाही तिथं 25 कोटी याला म्हणायचं काय? अशी संधी पुन्हा मिळणार नाही.

 एक महिला, त्यातही धाडसी महिला आणि सर्वात म्हणजे स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारं नेतृत्व.उठसुठ विरोध करून नुकसान करून घेण्यापेक्षा भुमिकेला समजावुन घेतलं तर जिल्ह्यात कोणताही गड विकासापासुन दुर राहणार नाही.याउलट कोटीच्या उड्डाणापेक्षा अब्जावधीची उड्डाणे जिल्ह्यात होतील आणि विकास हा खरच स्वप्नात पाहिल्यासारखं होईल. फरक आहे तो फक्त नेतृत्व समजुन घेण्याचा.

 उच्चविद्याभुषित राजकीय नेतृत्वाच्या डोळ्यासमोर आदर्श असतं आणि त्या मार्गाने नेतृत्व काम करतं. जिल्ह्याच्या पालकमंत्री बीड जिल्ह्यात काम करताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन काम करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती | देह झिजविती परोपकारे ||हा मार्ग डोळ्यासमोर ठेवुन त्यांची पाऊलवाट आहे. कधीकधी नेतृत्वाच्या मनाचा भाव कळुन चुकतो.

मात्र तो समजुनच घेतला नाही तर दुर्दैव म्हणावं लागेल. राज्यात भाजपा-सेना युतीची सत्ता आली त्यासाठी पित्यापेक्षाही काकणभर संघर्ष या नेतृत्वाने केला. वडिलांची छाया गेली एवढ्या संकटात एक महिला अनाथ होवुनही आपल्या छातीवर दगड ठेवते आणि केवळ लोककल्याणासाठी आपल्याला झोकुन देत घराबाहेर पडते.यातच असलेली महानता ही कमी नाही. स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न साकार करण्याची घेतलेली भीष्मप्रतिज्ञा, अनुयायांच्या हातचं सुख नियतीनं हिरावुन नेलं.

ते सुख याच लेकीनं संघर्ष करत पुन्हा मिळवलं आणि कार्यकर्त्याच्या पायावर लोळवलं. सुदैव सत्ता आली केंद्रात आणि राज्यातही आणि त्यात पंकजाताईचा मंत्री म्हणून समावेश झाला.अर्थात बीड जिल्ह्याच्या तमाम जनतेने एकहाती सुत्र ताईसाहेबांच्या नेतृत्वात दिलं. खासदार डॉ.प्रितमताई देशाच्या राजकारणात कोणत्याही नेत्याला एवढी मते मिळाली नाहीत तेवढ्या मताने जिल्ह्यातील लोकांनी निवडून दिलं. हा जिल्हा मुंडेंचा बालेकिल्ला आणि आजही आहे, उद्याही राहणार. पंकजाताईचं पालकमंत्री पद बीड जिल्ह्यातल्या लोकांच्यासाठी खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ म्हणावं लागेल.

 कधीकधी मंत्री म्हणून पाहण्यापेक्षा आणि नको तेवढ्या अपेक्षा करण्यापेक्षा त्या आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या लोकांच्यासाठी काय काम करतात? हे खऱ्या अर्थाने तपास्ाुन पहायला हवं. आतापर्यंत जिल्ह्यात एकही पालकमंत्री असा होवुन गेला नाही.मागच्या अडीच ते तीन वर्षाच्या काळात जिल्हा केवळ राजकीयदृष्ट्या शांत नव्हे तर पालकाच्या भुमिकेत बीड जिल्हा विकासाच्या दिशेने जात आहे. मुळात त्यांची भुमिका समजुन घेतली तर त्यांच्याकडे विकासाशिवाय कुठल्याही गोष्टीला प्राधान्य नाही आणि सर्वसामान्य जनतेला नेमकं हेच पाहिजे असतं. दोन-तीन वर्षात त्यांनी वेगवेगळ्या कामासाठी जिल्ह्यात आणलेला निधी पाहिल्यानंतर डोळे फाटतील एवढा पैसा आला आहे.

 पहिलं तर रेल्वेचा प्रश्न सुटला, जिल्ह्यात सर्व रस्ते चांगले होत आहेत, मोठे मोठे महामार्ग जिल्ह्यातुन जात आहेत,ग्रामीण रस्ते सुधारणा होत आहे,जलसंधारणाची कामे गावोगाव होत असल्याने सिंचन वाढलं, परिणामी उत्पादन वाढलं, वीज, पाणी आणि आरोग्य या मुलभुत प्रश्नावर करोडो रूपयांचा निधीचा महापुर जिल्ह्यात येत अाहे. मागचा अनुभव पाहिला तर खरंच एवढा पैसा जिल्ह्यात कधी आला का? जे लोक आज त्यांच्या भुमिकेला समजुन घेत नाहीत त्यांच्या काळात एक किमी तरी रस्ता चांगला झाला काय? असे अनेक प्रश्न पुढे येतात.

सत्ता असताना वैयक्तिक लाभापेक्षा सार्वजनिक लाभ यालाही महत्व देणं उचित असतं. कधीकधी खरंच या मंत्री नसत्या तर आज हे प्रश्न सुटले असते का? असाही प्रश्न पडतो. जिल्ह्यात नारायणगड, गहिनीनाथ गड हे मोठेमोठे भक्तीस्थाने आहेत. पुर्वी या तीर्थक्षेत्रासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. थोडाफार पैसा आलाही असेल मात्र आज केवळ गडाच्या विकासासाठी 25-25 कोटी रूपयाचा निधी येतो याचं कुठं तरी मुल्यांकन व्हायला हवं. 1 लाख रूपयांची योजना शासनाकडून आणायची म्हटलं तर नाकीनऊ येतात. मात्र या नेतृत्वात काम करण्याची असलेली धमक आणि माझा जिल्हा म्हणून मनात असलेली ओढ त्यातुन कोटीची उड्डाणे गडासाठी होताना दिसतात.

आरोप-प्रत्यारोप गलिच्छ राजकारण ऊठसुठ विकासाला आडवे येणे, याची टिका करणे त्याला नाव ठेवणे या गोष्टी त्यांच्यात बसत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विकास करताना आणि जिल्ह्याचं पालकत्व करताना अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सोबत घेवुन त्यांनी जिल्ह्याचा कारभार न्यायाच्या भुमिकेत चालवला आहे. सत्तेचा पाईक म्हणून त्या काम करताना दिसतात. प्रत्येकाला श्रद्धास्थान मानतात. त्यांचं मन स्वच्छ आणि प्रामाणिक आहे.

सकारात्मक भुमिका आणि मदतीचा हात नेहमीच पुढे असतो. मात्र अशा भुमिकेला न समजुन घेता केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी सार्वजनिक हिताचे नुकसान करत आपल्याच पायावर धोंडा पाडुन घेणारी दुष्ट मंडळीही असते. मात्र त्यांच्याकडेही कानाडोळा करत त्यांनी स्विकारलेला गांधीमार्ग हा खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्याला विकासाचं मॉडेल बनवणारं आहे. जिल्ह्यात जसे गड आहेत तसे अनेक तीर्थक्षेत्र आहेत. ज्यात बीड, परळीचा वैद्यनाथ, अंबाजोगाईची योगेश्र्वरी अशा अनेक ठिकाणी विकासासाठी पैसा देण्याची आणि आणण्याची गरज आहे.

लोकांनीही पुढाकार घेवुन त्यांचा फायदा घेण्याची गरज आहे. विनायकरावजी मेटे यांनी हे गमक ओळखलं आणि नेतृत्वासोबत कुठलाही संग्राम न करता आपणही त्याचा फायदा घेवु हे लक्षात येताच परिणाम गडासाठी कोटीची उड्डाणे होवु लागली. स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांना ज्या ज्या गडाचा आशिर्वाद मिळाला त्या गडाचा जीर्णोद्धार अहिल्यादेवीच्या कृपात पंकजादेवी करू लागल्या असं म्हटलं तर अतिशयोक्तीचं ठरणार नाही. भगवानगड ही तर पालकमंत्र्यांची खरी श्रद्धा आणि भक्ती आहे.

ज्या गडाच्या आशिर्वादानं साहेब मोठे झाले ते माझ्यासाठी सर्वस्व आहे. असं त्या मानतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाची उभारणी करून महाराष्ट्राच्या भुमीवर आदर्श निमाणर् केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं. तसंच काही आदर्श डोळ्यासमोर ठेवत बीड जिल्ह्याला आगळवेगळं बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. देशाच्या पंतप्रधानाला भगवानगडावर आणणार हे स्वप्न गोपीनाथराव मुंडेंचं होतं.

बाबाच्या आशिर्वादाने पुर्णत्वाकडे जावु लागलं. एक दिवस पंतप्रधान मोदी आलेही असते. मात्र नियतीच्या खेळाला बाबाही रोखु शकले नाहीत. ते स्वप्न साकार करण्याची जिद्द याच पालकमंत्र्यांत आहे. एक दिवस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवानगडावर येतील ज्या साहेबांना गडावरून दिल्ली दिसायची त्या दिल्लीश्र्वरांना गडावर आणण्याची ताकद साहेबांच्या आणि भगवानगडाच्या लेकीत आहे. मात्र दुर्दैव आड येतं तेव्हा माणसातला जीव काही करू शकत नाही.

ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही. ओळखुन घ्या. आशिर्वाद द्या आणि फायदा करून घ्या.तर बघा बीड जिल्ह्यात एका गडावर कोटीची उड्डाणे तर दुसऱ्या गडावर अब्जावधीची उड्डाणे झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण ना.पंकजाताई हे एक निमित्य आहे. मात्र त्यांच्या हातुन बरंच करून काही घेण्यासाठी पुढे येणं ही संधी असु शकते.

जिल्हा परिषदेच्या राजकीय भानगडीतुन मेटे यांची जवळीक झाली आणि बघताबघता काही क्षणात गडाच्यासाठी 25 कोटी मिळाले. ही जी ताकद आहे. ही ताकद माणसांत संधी असतानाच वापरून घेता येते. वेळ आणि संधी निघुन गेल्यानंतर पुन्हा रडण्यात अर्थ नसतो. वारकरी संप्रदायात आपुलिया हिता असे जो जागता हा संत तुकाराम महाराजांचा अभंग एक सांगतो जेव्हा हित असतं तेव्हा जागं राहिलं पाहिजे. दिव्याची वात चालु असतानाच तेल टाकलं फायदा असतो. दिवा बंद झाला पुन्हा तेल टाकणं कामाचं नसतं, चोर चोरी करून गेला पुन्हा रात्रभर जागुन फायदा नाही. तसंच काही या मंत्री पंकजाताई यांच्याबाबत म्हणावं ल्ाागंल. खुप काही करण्याची इच्छा आहे. मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात कुठल्याही शेतकऱ्यांना मिळाला नाही तेवढा निधी बीड जिल्ह्यात आला.

मोठ्या मोठ्या इमारती कोट्यावधी रूपयाने येत आहेत. जिल्ह्यात विविध क्षेत्रात नामवंत, जाणकार, प्रज्ञावंत, दुरदृष्टीचे मंडळी आहेत. त्यात वारकरी क्षेत्रातही काम करणारे आहेत. खऱ्या अर्थाने अशा वेळी विनाकारण पालकमंत्र्यांसोबत नको ते राजकारण करत बसण्यापेक्षा त्यांच्या नेतृत्वाचा फायदा घेणे किती महत्वाचे आहे हे ओळखुन चालण्याची गरज आहे. कोटीची उड्डाणे अब्जावधीत गेल्याशिवाय राहणार नाहीत.

सकारात्मक काम करणाऱ्या पालकमंत्र्यांची भुमिका समजुनही घेणे महत्वाचे आहे. अपेक्षा खुप आहेत. मात्र ते ठेवताना साहेबांचा चेहरा आणि त्या तुलनेत या लेकराचा चेहरा डोळ्यासमोर ठेवला तर अनेक गोष्टी आपण पोटात घालुन आशिर्वाद

Monday 17 April 2017


भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जेडी रंगनाथ चिरके रा.उपळी ता. वडवणी जि. बीड येथील रहिवासी असून सध्या जम्मू आणि काश्मीर मध्ये देशाच्या आतंकवादी दहशतवादी,उग्रवादी यांच्या विरोधात देशसेवेसाठी लढा देत आहेत...
तसेच त्यांच्या आयुष्यात पण ते एक लढा देत होते स्वतःच्या गावा साठी स्वतः च्या गावाच्या विकासा साठी
गाव उपळी लोकसंख्या जेमतेम ५००० ते ६००० हजार या गावात मागील तब्बल २० वर्ष झाले येथील बस सेवा बंद होती इतक्या दिवसात गावातील कोणी ही बस चालू करण्या साठी प्रयत्न केले नाही पण या सैनिकाच्या मनात जेवढं देशावर प्रेम आहे तेवढंच आपल्या जन्मभूमी वरही हा माझा मित्र सैनिक माघील 4 महिन्या पासून वारंवार नुसता भटकत होता जिल्हाधिकारी ,विभाग नियंत्रण प्रमुख, आगर प्रमुख अश्या खूप लोकांना तो भेटला पण या माझ्या मित्राच काम मात्र कोणी केलं नाही काही दिवसा पूर्वी माझी आणि त्यांची ओळख झाली त्यांनी मला त्यांची सगळी कामाची माहिती सांगितली व काम करण्यासाठी विनंती केली मला वाटले आपण लहान आपल्या कडून हे काम कस शक्य आहे पाहिले तर मी थोडा टाळण्याचा प्रयत्न केला मग नंतर मलाच माझी लाज वाटायला लागली हा सैनिक आपल्या साठी आपल्या देशासाठी लढतो आपलं पण काही कर्तव्य आहे यांच्या साठी काही करायचे मग मी काही माघचा पुढचा विचार न करता त्यांना शब्द दिला तुमचे काम पंकजाताई गोपीनाथ मुंडे करू शकतात आणि करतील पण परत प्रश्न पडला आता हे काम ताई पर्यंत पोहचवायच कसं आपली तर ओळख नाही तर करणार कस त्या साठी आमची मदत केली आमचे मित्र विजय कुटे यांनी त्यांनी सुद्धा पर्यंत केले काल त्यांनी आम्हाला काल कळवले ताईसाहेब माजलगाव मध्ये येणार आहेत म्हणून आमचे सैनिक मित्र यांना कळवले आणि डायरेक्ट भेटायला गेले ताईसाहेबांना काल त्यांची ताई सोबत भेट झाली आणि ताई ने त्याना आश्वासन दिले आहे आणि आ. आर.टी देशमुख यांना दोन दिवसात यांचे काम करायला सांगितले आहे ...!!!
आभार.. मा.पंकजाताई गोपीनाथ मुंडे
                                                 रंगनाथ चिरके
                                          मो.नं :- 94047 22640
#शेअर...!!!

Monday 10 April 2017


साहेब आज स्वर्गातून पाहत असतील तर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नसेल.साहेब तुम्ही पाहिलेल एकेक स्वप्न आज सत्यात उतरतय.आजीवन आम्हाला आपला सार्थ अभिमान राहील की अशा दोन दोन स्वाभिमानी वाघिण आम्हाला देऊन गेलात. तुमची लेक तुमच्याच पावलावर पाऊल टाकत वंचितांच्या प्रश्नांवर पार्लिमेंट मध्ये आवाज बुलंद ठेवतेय.
       जनसामान्यांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारे तुम्ही ज्या पद्धतीने गोरगरीब, दिन दूबळया माणसांच्या मनात घर निर्माण केले होते. प्रत्येक माणसाला तुम्ही आपले वाटायचात.
 आणि नेमका तोच वारसा तुमच्या वाघिणी राजकारणात आणि समाजकारणात समर्थपने चालवताना दिसत आहेत.
      तुम्ही सुरु केलेल्या ओबीसी  चळवळीला आज मुर्त रूप येत आहे. ओबीसी चळवळीचं झुंजार नेतृत्व तुम्हीच होतात. तुमचा लढ़ा आम्ही आजही विसरलो नाहीत साहेब..! बहुजनांच्या आणि ओबीसी च्या संपूर्ण प्रश्नांची उत्तम जान कुणाला होती तर ते तुम्ही होतात साहेब...!
        भारतीय जनता पक्ष हा ओबीसींचा म्हणजेच माळी, धनगर आणि वंजारी यां बरोबरच संपूर्ण अठरापगड़ जाती जमातींचा पक्ष करण्यात साहेब तुम्ही घेतलेल्या परिश्रमांची नोंद ही राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरात कोरली जाईल यात शंका नाही.
            महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी घटनेत जाणीवपूर्वक नोंद करुन ठेवलेल्या सोयी सवलती ओबीसीना मिळायलाच पाहिजेत यासाठी साहेब तुम्हीच आग्रही होतात. ओबीसींच्या जनगणनेचे महत्व तुम्हाला जेवढे पटले होते तेव्हढे महाराष्ट्राच्या राजकारणात इतर कुणालाही पटले नव्हते.या सगळ्या प्रश्नांवर तुम्ही दिल्लीत उठवलेला आवाज आम्हाला महाराष्ट्रात आजही घुमतोय तुमच्या निस्वार्थी योध्यांच्या ऋदयात आणि लाखो बहुजन-ओबीसींच्या घरात...!
          देशातील ओबीसींचीं जनगणना ओबीसी कोड टाकून करण्यात यावी ही तुमची धारणा होती. पार्लिमेंट मध्ये ओबीसीच्या कल्याणासाठी आणि हितासाठी साहेब तुम्ही सदैव पाठपुरावा करत राहिलात हे सुद्धा आम्ही विसरलो नाहीत.पण तुमच्या अनुपस्थितित या सगळ्या गोष्टींच्या पुर्ततेसाठी तुमच्या वाघिणी सारख्या लेकी जीवाच रान करत आहेत.तुमच्या या सगळ्या प्रयत्नाना पुन्हा वाचा फोडण्याच काम तुमची वाघिण ना प्रितमताई करत आहेत.

         आज संसदेत ओबीसी जनगणनेची जोरदार मागणी करताना खा.डाॅ.प्रितम गोपीनाथराव मुंडे म्हणतात की, कालेलकर आयोग आणि मंडल आयोग यांनी रचलेल्या पायावर आज ओबीसी आयोगास मिळालेल्या घटनात्मक दर्जामुळे कळस रचला गेला आहे आणि हा कळस जर सोनेरी करायचा असेल तर गोपीनाथराव मुंडे यांनी केलेल्या जातवार जनगणनेची मागणी पुर्णत्वास नेली पाहीजे, अस ठनकावून सांगताना साहेब तुमची मनोमन आठवण येत होती..!
         ताई आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही पण साहेबांप्रमाणे संसदेच्या पहिल्या बाकावर बसून साहेबांचाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याचा स्वाभिमान ताठ मानेने असाच डौलत राहुद्या.....!
विजय कुटे...!!!

Thursday 6 April 2017


स्व लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे हे ओबीसी जनतेच्या विकासासाठी आग्रही तर होतेच परंतु इतर उच्च समाजातील गरीबांचे प्रश्नही त्याना चांगल्या प्रकारे ठावुक होते.म्हणूनच जनतेने मुंडे साहेबाना "लोकनेता" ही बहुमानाची पदवी बहाल केली.
           राज्यघटनेत ३४० हे कलम ओबीसीं च्या विकासासाठी घेण्यात आले.या कलमाच्या माध्यमातून ओबीसी जनतेचा विकास तर झालाच पण स्व लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे यांच्यामुळे या जनतेला विविध क्षेत्रांमधील महत्वकांक्षा प्राप्त झाली. ३४० या कलमामुळे प्रथम कालेलकर आयोग आणि नंतर मंडल आयोग आले,यातूनच ओबीसी जनतेच्या प्रगतीला स्व मुंडे साहेबांमुळे चालना मिळत गेली.मुंडे साहेबानी मंडल आयोगाच्या आधारावर अनेक ओबीसी जनतेला नौकऱ्यांमध्ये आणले तसेच अनेक जणांना व्यवसाय क्षेत्रात उतरवले.
#Massleader
Gopinath Munde - गोपीनाथ मुंडे
#लोकनेता
f